नाशिक : प्रतिनिधी
मोटारसायकल चोरीचा चोरीचा प्रकार ठाकरे गल्ली, नाशिक शहर येथे घडला. याबाबत भद्रकाली पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की फिर्यादी राहुल राजाराम भोये (रा. विडी कामगारनगर, अमृतधाम, पंचवटी, नाशिक) हे काल दुपारी दीड वाजता हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी अॅक्टिव्हा मोपेड ठाकरे गल्लीतील आनंद फूटवेअरजवळ उभी केली होती. जेवण आटोपून परतल्यानंतर ते गाडी घेण्यासाठी गेले असता त्यांना मोपेड गाडी जागेवर दिसली नाही. त्यांनी आजूबाजूला चौकशी केली; परंतु गाडी मिळून आली नाही. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात भोये यांनी मोटारसायकलचोरीची फिर्याद दिली असून, पुढील तपास पोलीस हवालदार चौधरी करीत आहेत.
—
मोटारसायकलची चोरी
Get real time updates directly on you device, subscribe now.
Prev Post
Next Post