नाशिक : प्रतिनिधी
म्हसरूळ येथील पोकार काॅलनीतील इच्छापूर्ती रिद्धी-सिद्धी विनायक चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने तुलसी विवाह उत्साहात झाला.
आधल्या दिवशी हळदी समारंभ व मांडव टाकण्यात आला होता. लग्नाच्या दिवशी नवरदेव व नवरीची पारंपरिक वाद्यांच्या आवाजात मिरवणूक काढण्यात आली. आतषबाजीही झाली.
परिसरातील नागरिकच वऱ्हाडी
ह. भ. प. कविताताई पगार यांचे प्रवचन ठेवण्यात आले होते. गोरजमुहूर्तावर लग्न लावण्यात आले. आरतीनंतर महाप्रसादाची व्यवस्था होती. वऱ्हाडी म्हणून परिसरातील नागरिक उपस्थित होते. भगवंताचा विवाहरुपी मंगलमय सोहळा उत्तमरितीने पार पडला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ट्रस्टचे अध्यक्ष सुनिल निरगुडे यांच्यासह वैभव दरगोडे, भूषण वाढणे, पवन खोडे, विलास कडाळे, विनायक खोडे, वैभव उगले, अमोल बच्छाव, मच्छिंद्र खोडे, राजू खोडे, संपत खोडे, रवी वाघ, मोहिनेश निकाळे, मनिष गीते, सागर वाघ, ऋतिक झगडे, सागर खोडे, शैलेश देसले, युनूस तांबोळी, दीपक आतरदे, चंद्रकांत चौधरी, गोलू महाजन, दीपक भगाळे, विनोद ढाके, किशोर जोशी आदी प्रयत्नशील होते.
—