नाशिक : प्रतिनिधी
म्हसरूळ – मखमलाबाद लिंकरोडवरील सोहम मिसळसमोरील श्री गुरुस्थान येथे दरवर्षीप्रमाणे श्री दत्तजन्मोत्सव शनिवारी (दि.14) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. सायंकाळी सहा वाजता आरती व महाप्रसाद वाटप सुरु होईल.
सामाजिक कार्यकर्ते गणेश पेलमहाले यांनी सांगितले की, हे वर्ष विशेष यासाठी की आराध्या दैवत श्री दत्तात्रय महाराज हे साईबाबा, स्वामी समर्थ व गजानन महाराज स्वरूपात तर आहेच, पण सोबतच आद्य भगवान श्री महादेव बारा जोतिर्लिंग स्वरूपात विराजमान झाले आहेत. जोडीला कुळधर्मकुळाचार श्री खंडेराव म्हाळसा असून साक्षीला चिरंजीवी मारुतीरायादेखील स्थापित झाले आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने प्रत्येक भक्ताला येथे कुठल्या ना कुठल्या स्वरूपात गुरुदर्शन होणार हे नक्कीच. तसेच श्री खंडेराव म्हाळसा मंदिरातील आत्मलिंग हे पुन्हा गर्भगृहात स्थापित केले जाईल.
—