नाशिक : प्रतिनिधी
म्हसरूळ – मखमलाबाद लिंकरोडवरील सोहम मिसळसमोरील श्री गुरुस्थान येथे दरवर्षीप्रमाणे श्री दत्त जन्मोत्सव शनिवारी (दि.14) मोठ्या उत्साहात साजरा झाला. सायंकाळी सहा वाजता आरती व महाप्रसाद देण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते गणेश पेलमहाले व वंदना पेलमहाले यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव झाला.
याप्रसंगी श्री खंडेराव म्हाळसा मंदिरातील आत्मलिंग हे पुन्हा गर्भगृहात स्थापित करण्यात आले. उत्सवात दिगंबरा दिगंबरा श्रीपाल वल्लभ दिगंबरा हा श्री दत्त मंत्राचा जयघोष करण्यात आला. मंदिर परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले होते. शेकडो भाविकांनी याप्रसंगी उपस्थिती लावली.
—