म्हसरूळ, (वा.)
म्हसरूळ-मखमलाबाद (वाघेरे रोड) लिंक रोडच्या दुरूस्ती कामाचा शुभारंभ आमदार राहुल ढिकले यांच्या हस्ते गुरूवारी (दि.25) झाला.
या रस्त्याची ठिकठिकाणी दूरावस्था झाल्याने हा रस्ता चर्चेत आला होता. मात्र, आता कामास सुरूवात होत असल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
यांची उपस्थिती राऊ हॉटेलजवळील हनुमान चौकात या कामाचा भूमिपूजन समारंभ झाला. याप्रसंगी भाजप गटनेते अरुण पवार, स्थायी समितीचे सभापती गणेश गिते, माजी महापौर व नगरसेविका रंजना भानसी, नगरसेवक पुंडलीकराव खोडे, दामोदर मानकर, आरटीओ काॅर्नर येथील छत्रपती शिवाजी महाराज भाजी मार्केटचे अध्यक्ष किरण काकड, सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक प्रभाकर रायते, भाजपचे मंडल अध्यक्ष ज्ञानेश्वर काकड, वाळू काकड, बाळासाहेब राऊत, अजित तारगे, सत्यनारायण पांडे, सोमनाथ वडजे, प्रशांत मोराडे, रोहिणी दळवी आदी उपस्थित होते.
राजकारण तापले होते
आता या कामासाठी तीन कोटी 51 लाख रूपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. हा रस्ता महापालिका हद्दीत आहे. मात्र, त्याची देखभाल सार्वजनिक बांधकाम विभाग करत आहे. रस्त्याची दूरवस्था असल्याने स्थानिक राजकारण तापले होते. याबाबत आंदोलनेही झाली. राऊ हाॅटेलजवळ खड्ड्यांत पोत्यांची शर्यत ते वृक्षारोपण असे उपरोधिक प्रकारची आंदोलनेही झाली. हा रस्ता महापालिका प्रशासनाच्या ताब्यात नसल्याने महापालिकेला निधी देता येत नव्हता. पण, हा रस्ता महापालिका हद्दीत असल्याने स्थानिक राजकारण तापले होते. त्यात महापालिका निवडणूक जवळ आल्याने या मुद्द्याला अधिकच महत्त्व प्राप्त झाले होते.
—