म्हसरूळ, (वा.)
येथील हर्षल इंगळे मित्र परिवारातर्फे महिला दिनानिमित्त पाककला स्पर्धा झाली. त्यात दुधापासून विविध व छान पदार्थ हे सुंदर सजावटीसह महिलांनी तयार केले होते.
महिलांनी प्रामुख्याने दुध मुग पेढा, दुधाचा खाजा, दूध ढोकळा, दूध रताळी रबडी, बासुंदी, दूध पाक असे विविध पदार्थ तयार केले होते.
प्रमुख निरीक्षक म्हणून मास्टर शेफ किरण मरेरे, सौन्दर्य स्पर्धा विजेत्या डॉ. रुपाली गागुंडा होत्या. त्यांनी पाककलेबरोबरच दैनंदिन धकाधकीच्या जीवनातील आहाराचे महत्त्व पटवन दिले. स्पर्धेचे प्रमुख आयोजक वृषाली जैन, ज्योस्त्ना डगळे, सचिन लोणारी, प्रशांत इंगळे, कांता जैन होते.
स्पर्धेचा निकाल असा : प्रथम – संगीता पांडे (मूग पेढा), द्वितीय – सौ. स्वाती वाटाणे (रताळ्याची खीर), तृतीय – सौ. शिल्पा शिखरे (मखाने बासुंदी) व सौ. पांडे (स्वीट खाजा)