नाशिक : प्रतिनिधी
योग विद्या गुरुकुल, नाशिक अंतर्गत येथील हरिओम योग केंद्रातर्फे महिला दिनी कार्यक्रम झाला. यात योगसाधक व शिक्षकांनी भाग घेतला. तन्वीषा धस या पाचवर्षीय चिमुकलीने योगाचा जोगवा, तसेच प्लॅस्टिक वापर टाळण्याचा संदेश नृत्याद्वारे दिला.
प्रतिभा धस यांनी महिलांचे शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी योगसाधनेचे महत्व सांगितले. तसेच योगसाधना ज्या शरीराच्या माध्यमातून करायची आहे, ते शरीर अन्नमय कोषापासून तयार होते, त्यासाठी आहार कसा घ्यावा याविषयी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी योगगीत, योग पोवाडा, जोगवा, एकपात्री, भावगीत यांचे सादरीकरण साधक व शिक्षकांनी केले.
राजेंद्र निकम व प्रतिभा धस यांचे हस्ते शिक्षकांना भेटवस्तू देवून गौरविण्यात आले. रमेश धस यांनी केंद्राच्या आगामी वर्गांबाबत माहीती दिली. दक्षणा औटी यांनी सूत्रसंचालन केले. अपर्णा कंक यांनी आभार मानले.
—