म्हसरूळ, (वा.)
भारतीय जनता पक्षाचे दिवंगत नेते, माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या 72 व्या जयंतीनिमित्त येथे अभिवादन करण्यात आले.
आरटीओ कॉर्नर येथील छत्रपती शिवाजी महाराज भाजी मार्केटचे अध्यक्ष किरण काकड व मनीषा काकड यांनी मुंडे यांच्या प्रतिमेचे फुले वाहून पूजन केले.
याप्रसंगी किरण काकड म्हणाले की, मुंडे यांनी समाज उन्नतीसाठी मोठे काम केले आहे. त्यांच्या कार्याने सामाजिक काम कसे करावे, अशी सर्वासाठी एक मार्गदर्शक वाट तयार झाली आहे. त्याचा फायदा घेऊन कार्यकर्त्यांनी समाजोपयोगी कामे करावीत.
—