म्हसरुळ, (वा.)
दत्तजयंतीनिमित्त म्हसरुळ-मेरी परिसरात दत्ता सानप यांच्या नेतृत्वाखालील दिंडोरी रोड मित्रमंडळ, ओंकार पॉईंट मित्रमंडळ आणि जुईनगर रोड मित्रमंडळातर्फे यंदाही ओंकार पॉईंट येथे भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दत्तगुरूंची पालखी परिसरातून काढण्यात आली होती. नागरिकांनी दिवसभर दर्शनासाठी गर्दी केली होती.
मेरी-म्हसरुळ परिसरातील दत्तभक्तांनी या भंडाऱ्याचा लाभ घेतला. यावेळी तिन्ही मंडळांच्यावतीने भक्तांना बुंदी, शिरा, मसाला भात प्रसाद म्हणून देण्यात आला. म्हसरुळ : दिंडोरी रोड मित्र मंडळ, ओंकार पॉईंट मित्र मंडळ आणि जुईनगर रोड मित्र मंडळातर्फे ओंकार पॉईंट येथे भक्तांना प्रसाद वाटप करताना दत्ता सानप आणि मंडळाचे कार्यकर्ते.
कोरोना प्रतिबंधात्मक मास्क वापर आणि सुरक्षित अंतर या नियमांचे पालन करत हा भंडारा साजरा करण्यात आला. भक्तांना जेवण देणे, तसेच प्रसाद वाटपासाठी गणेश सोनार, राजेंद्र साळुंके, प्रणाय सोनवणे, मोराडे काका, के. डी. उगले, तांबट काका, प्रवीण हुमन, संदीप कोकोटे, प्रणव सोनवणे यांनी मदत केली.
—