म्हसरूळ, (वा.)
येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज भाजी मार्केट, आरटीओ कॉर्नर येथे भाजी विक्रेत्यांना पथविक्री प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. नाशिक शहरातील हे पहिलेच भाजी मार्केट की जेथून प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी भाजी मार्केटचे अध्यक्ष किरण काकड यांनी सर्व मान्यवरांचा सत्कार केला.
याप्रसंगी मनपा गटनेते अरूण पवार, माजी महापौर व नगरसेविका रंजना भानसी, स्थायी समितीचे सभापती गणेश गिते, मनपाचे पंचवटी विभागीय अधिकारी महेंद्रकुमार पगारे, भाजी मार्केटचे अध्यक्ष किरण काकड, सामाजिक कार्यकर्त्या दीपाली गिते, मनपाचे भूषण देशमुख, राजेश सोनवणे, प्रकाश उखाडे, राहुल बोटे, सचिन गवळी, तसेच भाजी मार्केटचे बाळासाहेब फापाळे, फिरोज खाटीक, बाळू गुंजाळ, सागर वैश्य, आकाश लोखंडे आदी उपस्थित होते.
—