नाशिक : प्रतिनिधी
येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात यावर्षी प्रथमतः चित्रकलेला आणि चित्रकारांना स्थान देण्यात आले होते. चित्रप्रदर्शनात सुप्रसिद्ध चित्रकार राजेश सावंत, प्रफुल सावंत, राहुल पगारे यांनी लाईव्ह चित्रे रेखाटली. तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थित चिमुकल्या कलाकारांनीही अप्रतिम चित्रे रेखाटून सर्वांना थक्क केले.
चित्रप्रदर्शातील बाळासाहेब ठाकरे आणि छगन भुजबळ यांची छायाचित्रे मोहिनी घालणारी ठरली. गो. सा. हळदणकर, वा. गो. कुलकर्णी, संजय गुल्हाने, शिवाजी तुपे, नाना तांबट, अंबादास नागपुरे, रामेश्वर बैरागी, रमेश पंडित, रामदास महाले, आनंद सोनार, केशवराव मोरे, मधू जाधव, जानमाळी, विनायक टाकळकर, श्याम जाधव, अनिकेत महाले, अशोक ढिवरे, सावंत बंधू, पंडित खैरनार यांच्या चित्रांचा समावेश होता.
—