नाशिक : प्रतिनिधी
येथील ॲड. उत्तमराव नथुजी ढिकले पंचवटी सार्वजनिक वाचनालयातर्फे वाचनालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त इयत्ता पाचवी ते आठवीच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेचे आयोजन केले होते. शहरातील अनेक शाळांनी यात सहभाग घेतला. या स्पर्धेत मराठा हायस्कूलच्या संघास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. त्यातंर्गत स्मृतीचिन्हे, प्रशस्तीपत्रक व रोख पाचशे एक रुपये नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले, प्रा. शांताराम रायते आणि इतर मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
मराठा हायस्कूलच्या संघाने चलो जवानो बढो जवानो हे हिंदी देशभक्तीपर गीत सादर केले. या संघात स्वानंदी विधाते, आराध्या गांगुर्डे, अनुष्का खोडदे, संस्कृती देशमाने, क्रिष्णा जाधव, हितेश कोळी, अश्मित आहेर, अर्णव काळे, प्रसाद गांगुर्डे या विद्यार्थ्यांनी गायन केले. तसेच या सर्व विद्यार्थ्यांना तबल्याची साथ दिली शिवदास गांगुर्डे याने व ढोलकीची साथ दिली संकेत चव्हाण याने झांजरी साथ दिली साई बोराडे याने. या सर्व विद्यार्थ्यांना मराठा हायस्कूलचे संगीतशिक्षक दिनकर दांडेकर यांचे मार्गदर्शन लाभले.
त्यांच्या या यशाबद्दल मविप्र समाज संस्थेचे अध्यक्ष डाॅ. सुनील ढिकले, उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, सरचिटणीस ॲड. डाॅ. नितीन ठाकरे, चिटणीस दिलीप दळवी, सभापती बाळासाहेब क्षिरसागर, उपसभापती देवराम मोगल, नाशिक शहर तालुका संचालक ॲड. लक्ष्मणराव लांडगे, नाशिक ग्रामीणचे तालुका संचालक रमेश पिंगळे व सर्व संचालक मंडळ, मविप्र समाज संस्थेचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रा. डाॅ. भास्कर ढोके, शिक्षणाधिकारी प्रा. डाॅ. अशोक पिंगळे, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डी. डी. जाधव, शालेय समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य, पालक – शिक्षक संघाचे अध्यक्ष व सर्व सदस्य, मुख्याध्यापिका कल्पना वारुंगसे, पर्यवेक्षक प्रकाश पवार, शिवाजी शिंदे, रंजना घंगाळे, सर्व शिक्षक वृंद,शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
—