नाशिक, (वा.)
मविप्र समाज संस्थेच्या गंगापूर रोडवरील मराठा हायस्कूलची इन्सपायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शनात राज्यस्तरावर निवड झाली आहे. विद्यालयातील इयत्ता ८ वीची विद्यार्थिनी पयोष्णी नितीन शिंदे हिच्या ॲटोमॅटीक कर्टन ओपनर इन कोविड कंडीशन या उपकरणाची राज्यस्तरावर निवड झाली. तिला विज्ञान शिक्षक हेमंत पाटील, तसेच इतर सर्व विज्ञान शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
नाशिक येथील मराठा हायस्कूलची विद्यार्थीनी पयोष्णी शिंदे हिच्या उपकरणाची इन्सपायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शनात राज्यस्तरावर निवड झाल्याबद्दल तिचा सत्कार करताना मुख्याध्यापक हरीभाऊ दरेकर, उपमुख्याध्यापक उत्तमराव बस्ते, पर्यवेक्षक शरद शेजवळ, संजीवनी घुमरे, मंदाकिनी पाटील, हेमंत पाटील व सर्व विज्ञान शिक्षक आदी.
–
तिच्या या यशाबद्दल मविप्र समाज संस्थेचे अध्यक्ष डाॅ. तुषार शेवाळे, सरचिटणीस निलीमाताई पवार, चिटणीस डाॅ. सुनील ढिकले, सभापती माणिकराव बोरस्ते, उपसभापती राघो नाना आहिरे, नाशिक शहर तालुका संचालक नानासाहेब महाले, नाशिक ग्रामीणचे तालुका संचालक सचिन पिंगळे व सर्व संचालक मंडळ, मविप्र समाज संस्थेचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रा. डाॅ.संजय शिंदे, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी चंद्रजित शिंदे, शालेय समितीचे अध्यक्ष खासदार प्रतापदादा सोनवणे, शालेय समितीचे सर्व सदस्य, मुख्याध्यापक हरीभाऊ दरेकर, उपमुख्याध्यापक उत्तमराव बस्ते, पर्यवेक्षक शरद शेजवळ, संजीवनी घुमरे, मंदाकिनी पाटील व सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
—