नाशिक, (वा.)
मविप्र समाज संस्थेच्या गंगापूर रोडवरील मराठा हायस्कूलमध्ये कर्मवीर ॲड. विठ्ठलराव हांडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक हरिभाऊ दरेकर होते. व्यासपीठावर उपमुख्याध्यापक खंडेराव वारुंगसे, पर्यवेक्षक शरद शेजवळ, संजीवनी घुमरे, मंदाकिनी पाटील, उपस्थित होते.
ॲड. हांडे यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
दरेकर म्हणाले, विद्यार्थी दशेपासूनच ॲड. विठ्ठलराव हांडे यांचा मविप्र समाज संस्थेशी संबंध आला. त्यांचे शिक्षण हे मराठा हायस्कूलमध्ये झाले. वकिलीची पदवी मिळाल्यानंतर नाशिक येथील न्यायालयात वकिलीचा व्यवसाय त्यांनी सुरू केला. १९४६ पासून त्यांनी संस्थेच्या कामाला सुरुवात केली. ॲड. हांडे यांनी मराठा मविप्र संस्थेत दीर्घकाळ कार्यकारणी सदस्य, चिटणीस आणि सभापती अशा विविध पदांवर कामकाज केले. संस्थेच्या वाटचालीत त्यांचे योगदान खूप महत्त्वाचे आहे.
सुनील कदम यांनी सूत्रसंचालन केले. उपमुख्याध्यापक वारुंगसे यांनी आभार मानले.
—