नाशिक : प्रतिनिधी
मविप्र समाज संस्थेच्या मराठा हायस्कूलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक हरिभाऊ दरेकर होते. व्यासपीठावर उपमुख्याध्यापक खंडेराव वारुंगसे, पर्यवेक्षक शरद शेजवळ, संजीवनी घुमरे, मंदाकिनी पाटील उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
दरेकर म्हणाले की, भारतरत्न डॉ. आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. ते एक महान समाजसुधारक आणि अभ्यासक होते. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, स्वतंत्र भारताचे पहिले कायदे पंडित आणि दलितांचे ते कैवारी होते.
चैताली गीते यांनी सूत्रसंचालन केले. उपमुख्याध्यापक वारुंगसे यांनी आभार मानले.
—