नाशिक : प्रतिनिधी
महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ म. फुले यांनी रोवली. शेतकरी, बहुजन समाज, स्त्रीशिक्षण यासाठी त्यांनी केलेले काम हे अविस्मरणीय आहे. ते दुर्लक्षित समाजासाठी लढणारे एक असामान्य व्यक्तिमत्त्व असून केवळ आपल्या कर्माने ज्यांनी महात्मा ही पदवी मिळवली आहे, असे प्रतिपादन मुख्याध्यापक हरिभाऊ दरेकर यांनी केले.
मविप्र समाज संस्थेच्या नाशिक येथील मराठा हायस्कूलमध्ये क्रांतीसूर्य म. ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम झाला. तेव्हा ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
मविप्र समाज संस्थेच्या नाशिक येथील मराठा हायस्कूलमध्ये क्रांतीसूर्य म. ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम झाला. तेव्हा ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
व्यासपीठावर उपमुख्याध्यापक खंडेराव वारुंगसे, पर्यवेक्षक शरद शेजवळ, संजीवनी घुमरे, मंदाकिनी पाटील उपस्थित होते. म. फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
मुख्याध्यापक दरेकर म्हणाले, म. फुले हे मराठी लेखक, विचारवंत आणि थोर समाज सुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली.
उपशिक्षक किरण शिंदे यांनी म. फुले यांच्या कार्याचा आढावा घेतला.चैताली गीते यांनी सूत्रसंचालन केले. पर्यवेक्षक शरद शेजवळ यांनी आभार मानले.
—
—