नाशिक : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई (एमएसबीटीई) यांच्याकडून करण्यात आलेल्या मूल्यांकन तपासणीव्दारे महावीर पॉलीटेक्निकल महाविद्यालयातील चार विभागांना सर्वोत्कृष्ट श्रेणी मिळविण्याचा बहूमान प्राप्त झाला आहे.
महाराष्ट्रातील तंत्रशिक्षणातील दर्जा सुधारण्यासाठी विविध पॉलीटेक्निकचे वार्षिक मूल्यांकन करून त्यांना दर्जा देण्याचे काम महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांच्याकडून केले जात असते. बोर्डाने ठरवून दिलेल्या निकषांचे तंतोतंत पालन आणि उपयोजन महाविद्यालयाकडून करण्यात आले. या मूल्यांकनात महावीर पॉलीटेक्निकमधील मॅकेनिकल, सिव्हिल इलेक्ट्रिकल आणि कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागास सर्वोत्कृष्ट दर्जा मिळाला आहे. प्रामुख्याने एमएसबीटीईकडून प्रमाणित शिक्षक वर्ग, सुसज्ज प्रयोगशाळा, ग्रंथालय, संशोधन, विद्यार्थी सुविधा, निकाल, प्लेसमेंट, विद्यार्थी अभिप्राय आदी निकषांची तपासणी करण्यात करण्यात आली होती.
“पॉलिटेक्निकने वेगवेगळे उपक्रम राबवून गुणवत्तापूर्ण शिक्षणाव्दारे विद्यार्थी व पालक यांचा विश्वास संपादन केला असून उत्कृष्ट निकालाची परंपरा राखत, कॅम्पस प्लेसमेंट मिळवून देण्याचे काम या पॉलिटेक्निकने केले असल्याचे मत प्राचार्य डॉ. संभाजी सगरे यांनी यावेळी व्यक्त केले.
महावीर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष हरिश संघवी, कार्यकारी विश्वस्थ राहुल संघवी आणि सोसायटीच्या समन्वयिका, तसेच डीन डॉ. प्रियंका झंवर यांनी पॉलिटेक्नीकच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले असून विद्यार्थी पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.
—