नाशिक : प्रतिनिधी सिल्व्हर आयकॉन योगथेरपी, नॅचरोपॅथी ॲण्ड फिजिओथेरपी ग्रुपचे अध्यक्ष तथा भाजप योग प्रकोष्ठचे सहसंयोजक डॉ. योगेश कुलकर्णी यांची योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघाच्या उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. योगशिक्षक संघाचे उत्तर महाराष्ट्र विभागाचे मावळते प्रमुख यु. के अहिरे, राज्य कोषाध्यक्ष प्रसाद कुलकर्णी व माजी संमेलनाध्यक्ष अशोक पाटील यांच्या शिफारसीवरून महाराष्ट्र योगशिक्षक संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मनोज निलपवार यांनी ही नियुक्ती केली आहे. डॉ. योगेश कुलकर्णी यांनी पीएचडी (ॲस्टो), बीई कॉप्युटर (आयटी), एम.ए. (योगशास्त्र), डीएनवायएस यासह ज्योतिष, पत्रकारिता, रेकी अशा बावीसहून अधिक विविध विषयात उच्च शिक्षण व पदविका मिळवलेल्या आहेत. या ज्ञानाचा उपयोग मुख्यतः भारतीय सैन्यासाठी ते १९९२ पासून करत आहेत. एक विशेष सैन्य मोहिमेदरम्यान अगदी मोक्याच्या क्षणी केलेल्या उत्कृष्ट गोपनीय कामगिरीसाठी तत्कालीन राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले होते. आजही डॉ. कुलकर्णी हे मिलिटरी हॉस्पिटल आणि अन्य सैन्य संस्थांना विशेष सेवा उपलब्ध करून देत आहेत. —