एम. ए. योगशास्त्राच्या परीक्षांना नाशिकमधील धम्मगिरी योग महाविद्यालयासह विविध केंद्रांवर सुरूवात

0

नाशिक : प्रतिनिधी
रामटेक (नागपूर) येथील कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठातंर्गत येथील धम्मगिरी योग महाविद्यालयात विद्यापीठाच्या योग अभ्यासक्रमातंर्गत एम. ए. या पदव्युत्तर परीक्षेच्या एकूण चार सत्रापैकी पहिल्या सत्राच्या परीक्षेचा प्रारंभ झाला. शहरातील सर्व केंद्रावर ही परीक्षा सुरू आहे.
धम्मगिरी योग महाविद्यालय या केंद्रावर संस्कृत या विषयाने या सत्र परीक्षेची सुरुवात झाली आहे. या परीक्षेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. आठ फेब्रुवारीला परीक्षा समाप्त होणार आहे. धम्मगिरी योग महाविद्यालयाचे प्राचार्य यु. के. अहिरे, प्रा. राज सिन्नरकर, प्रा. तुषार विसपुते, प्रा. चैतन्य कुलकर्णी, प्रा. राधिका अंभोरे, कैलास  जाधव यांच्या उपस्थितीत परीक्षा केंद्रावर चोख व्यवस्था ठेवली आहे.
ह्यावेळी उपस्थितांनी विद्यार्थ्यांना परीक्षांच्या शुभेच्छा दिल्या.

तरूणांचे योगविद्येकडे आकर्षण

योगविद्येकडे तरूणांचे आकर्षण वाढत आहे. संपूर्ण विश्वात या विद्येचा प्रसार दिवसेंदिवस होत आहे. योगविद्या लाखो वर्ष जुनी आहे. पण, महर्षी पतंजलि मुनी यांनी अडीच हजार वर्षांपूर्वी या विद्येला शास्त्रीय स्वरूप दिले, सूत्रबद्ध केले. यात योगविद्येबरोबरच जगणं समृद्ध करणारे आयुर्वेद, निसर्गोपचार आदी विषयही शिकविले जातात. योगाचा आता नाशिक हा  हब समजला जात आहे.

– योगाचार्य व प्रेरणादायी वक्ते प्रा. राज सिन्नरकर

योगविषयक अभ्यासक्रमाने चैतन्य

कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाने योगविषयक पदविका, पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू केल्याने महाराष्ट्रात चैतन्य पसरले आहे. भारतीय ॠषी-मुनींनी समाजाचा विकास व्हावा यासाठी योग परपंरा सुरू केली आहे. या योगविषयक अभ्यासक्रमाने विद्यार्थ्यांचे मन, बुद्धी व आरोग्याचा विकास होईल. मग त्यांनी कुटूंब व समाजाला याचा परिचय करून द्यावा.
– यु. के. अहिरे, प्राचार्य – धम्मगिरी योग महाविद्यालय, नाशिक

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.