`लोकमान्य शिक्षणप्रसारक मंडळा’तर्फे मुख्याध्यापक-शिक्षक कार्यशाळा संपन्न

0

म्हसरूळ, (वा.)
प्रत्येक शिक्षकाने तंत्रस्नेही होऊन, अध्ययन व अध्यापनात गुणवत्ता आणावी. प्रत्येक कार्यशाळेतून नित्यनवीन शिकावे. विद्यार्थी हे लहानपणी घेतलेले अनुभव कधीही विसरत नाही. लहानपणी रूजलेल्या चांगल्या सवयी आयुष्यभर टिकतात, असे प्रतिपादन संस्थेचे कार्यकारिणी सदस्य व प्राथमिक विद्यामंदिरचे शालेय समिती अध्यक्ष शशांक ईखणकर यांनी केले.   

`लोकमान्य शिक्षणप्रसारक मंडळा’तर्फे मुख्याध्यापक-शिक्षक कार्यशाळा झाली. तेव्हा ईखणकर बोलत होते.

शिक्षकांत कार्यशाळेविषयी चर्चा                                   उपशिक्षिका सीमा कुलकर्णी यांनी डिजिटल ओळखपत्र तयार करणे व राजेंद्र बिऱ्हाडे यांनी फेसबुक लिंक तयार करणे या विषयावर मार्गदर्शन केले व प्रात्यक्षिकही करून घेतले. संस्थेचे उपाध्यक्ष उदय शेवतेकर यांनी उपस्थित शिक्षकांत कार्यशाळेप्रसंगी आलेले विविध अनुभव, याविषयी चर्चा घडवून आणली. कार्यशाळेत घेतलेल्या ज्ञानाचा दैनंदिन जीवनात उपयोग करावा, विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून द्यावा, असेही त्यांनी सांगितले. शिक्षकांनी यावेळी अनुभव कथन केले.
          प्राथमिक विद्यामंदिराच्या मुख्याध्यापिका भारती ठाकरे यांनी प्रास्ताविक केले. भयाळे येथील लोकमान्य विद्यालयाचे मुख्याध्यापक दीपक गोविंद यांनी आभार मानले. अर्पिता घारपुरे यांनी सूत्रसंचालन केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.