नाशिक : प्रतिनिधी
सिडकोतील अश्विननगर येथील `यूडब्लूसीईसीʼमध्ये मकर
विद्यार्थी आणि शिक्षकांनी यानिमित्त काळ्या रंगाचा पोशाख परिधान केला होता. या दिवशी पृथ्वी आणि सूर्याच्या स्थितीत होणारे बदल मुलांना समजावून सांगण्यात आले. ज्यामुळे दिवस मोठे आणि रात्र लहान होते. मुलांना काळे कपडे घालण्याचे आणि तीळ खाण्याचे कारण समजावून सांगण्यात आले.
या उत्सवात विद्यार्थ्यांनी तिळगुळाचे लाडू आणि चिक्की शिक्षकांच्या मदतीने बनविली. तसेच पतंग बनवणे, रंगवणे, रंगीबेरंगी रांगोळीचे पतंग बनवणे असे वेगवेगळे उपक्रम घेण्यात आले. व्हिडिओच्या माध्यमातून मुलांना त्यांची भांडणे विसरून एकमेकांशी तिळगुळाची देवाणघेवाण करून पुन्हा मित्र बनण्यास समजावून सांगण्यात आले. `तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला बोलाʼ म्हणत सर्वजण या मिठाईची देवाण-घेवाण आपल्या कुटुंबियांसोबत करून आनंद व्यक्त करीत होते. विद्यार्थ्यांना प्रत्येक सणाचे महत्त्व समजावे यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला होता.
—