नाशिक : प्रतिनिधी
येथील योगाचार्य व प्रेरणादायी वक्ते राज सिन्नरकर यांनी कवीकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठात एम. ए. योगशास्त्रात विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत दुसरा क्रमांक प्राप्त केला आहे.
सिन्नरकर यांनी योग महाविद्यालयातून हा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. याआधीही त्यांनी बी.ए. योगशास्त्र करताना घवघवीत यश संपादन केले आहे. सध्या ते एम. ए. मानसशास्त्र हा अभ्यासक्रम करीत असून पुढे योगशास्त्रात पीएच डी करण्याचा त्यांचा मानस आहेत. ते प्रा. तुषार विसपुते, प्रा. चैतन्य कुलकर्णी, डॉ. सचिन पाटील यांच्यासह महर्षि पतंजली योगसंस्कार निकेतनच्या माध्यमातून योगविषयक अनेक उपक्रम राबवत आहेत.
सिन्नरकर हे विविध महाविद्यालयांतूनही योगशास्त्र अभ्यासक्रम शिकवत आहेत. तसेच विविध व्यासपीठांवरून ते योगशास्त्रावर व्याख्याने देत आहेत. कोरोना काळात त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह जलनेती या योगशास्त्रातील प्रक्रीयेविषयी हजारो लोकांमध्ये प्रात्यक्षिकांसह जनजागृती केली होती, त्यानिमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महापौर सतीशनाना कुलकर्णी यांच्या हस्ते त्यांचा सत्कारही झाला होता.