प्राकृतिक चिकित्सेच्या परीसाने विनाऔषध आजार बरे होऊ शकतात : प्रा. राज सिन्नरकर 

इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशनतर्फे नाशिकमधील धम्मगिरी योग महाविद्यालय येथे उपक्रम 

0
नाशिक : प्रतिनिधी
आजच्या युगात प्रत्येकाला असेच वाटते आहे की औषधे घेतल्याशिवाय मी बराच होणार नाही…ही चुकीची विश्वास प्रणाली मनुष्याच्या डोक्यात पक्की झालेली आहे…आणि हीच खरी समस्या आहे..पण आता ही चुकीची विश्वास प्रणाली दुरुस्त करण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन प्रेरणादायी वक्ते व योगशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक प्रा. राज सिन्नरकर यांनी केले.
       इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशनतर्फे आंतरराष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा दिनानिमित्त धम्मगिरी सामाजिक, सांस्कृतिक संस्था संचलित, धम्मगिरी योग महाविद्यालय येथे या चिकित्सेविषयी माहिती देण्यात आली. याप्रसंगी प्रा. सिन्नरकर बोलत होते.
    प्रा. सिन्नरकर म्हणाले की,  मी औषधाशिवायही विकारमुक्त होऊ शकतो…हा अनमोल सिध्दांत केवळ प्राकृतिक चिकित्साच मानवात रुजवु शकते… `मिट्टी, पाणी, धूप, हवा – सब रोगो की यही दवा’ हा प्राकृतिक चिकित्सेचा मूलभूत सिद्धांत आहे. प्राचीन ऋषींनी हजारो वर्षांपूर्वी हा प्राकृतिक चिकित्सेचा परीस आपल्या हाती दिला आहे, त्यामुळे किरकोळ आजारांपासून ते जुनाट आजारांपर्यंत प्राकृतिक चिकित्सा मनुष्याला विकारमुक्त करू शकते, अर्थात मनुष्याला विकारमुक्त करण्यापेक्षा त्याला आरोग्यसंपन्न करणे,त्याला विकार मुक्त , आनंदी जीवन जगता येईल अशी जीवनशैली विकसित करणे हेच खरे प्राकृतिक चिकित्सेचे ध्येय आहे.
यांची उपस्थिती                                                    याप्रसंगी इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशनच्या संयुक्त सचिव प्रा. तस्मिना शेख, नाशिक जिल्ह्याच्या संयुक्त सचिव सुनिता पाटील, प्रा. संध्या सोमय्या, योगशिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष यू. के. अहिरे, प्रा. पुरुषोत्तम सावंत, धम्मगिरी संस्थेचे अध्यक्ष कैलास जाधव, सचिव डॉ. पल्लवी जाधव, डॉ. विशाल जाधव, प्रा. तुषार विसपुते, डाॅ. अजय पुरीवार, प्राचार्य जगदीश मोहुर्ले, उपप्राचार्य राजेंद्र काळे, नारायण सूर्वे वाचनालय व मायको फोरमचे राजू नाईक, योगशिक्षक डाॅ. सतीष वाघमारे, डाॅ. विद्या वाघमारे, रंजना पाटील, प्रा. शिवाजी खोपे, कायदेविषयक सल्लागार ॲड. शरद जाधव, कीर्ती शिर्के आदी उपस्थित होते.
           प्रा. सिन्नरकर म्हणाले की, पंचमहाभूतांपासून माझे शरीर बनलेले आहे, या शरीराला विकारमुक्तही पंचमहाभूतेच  करतील, या चिकित्सेने साध्या विकारांपासून ते गंभीर , जुनाट विकारांच्या व्यक्तीही विकारमुक्त होऊ शकतात. उपवास, लंघन उपचार ही आकाश तत्व चिकित्सा आहे. त्याने असंख्य ..विकार बरे होऊ शकतात,शरीरात साठलेले विजातीय द्रव्ये जवळच्या मार्गाने, निरनिराळ्या पद्धती बाहेर काढणे, हेच विकार मुक्तीचे खरे रहस्य आहे, असे त्यांनी सांगितले.
ही चिकित्सा पद्धती आपण सर्वजण..`हट टू हट’ व `हर्ट टू हर्ट’ पोहचवु, हेच प्राचीन भारतीय ऋषींचे खरे तर्पण आहे, असेही ते म्हणाले.
`संकटातून बाहेर काढेल’
        प्रा. सिन्नरकर म्हणाले,  प्राचीन ऋषींनी उभी केलेली ही चिकित्सा हजारो वर्षे भारतात चालली. यानंतर काही कारणांनी ती लुप्त झाली. कोरोना महामारीत दोन काळेकुट्ट वर्षे जगाच्या डोक्यावरून निघून गेली आणि मानवतेला हादरे बसावेत, असे अनेक प्रसंग  संपूर्ण जगातच निर्माण झाले. ही प्राकृतिक चिकित्साच आपल्याला अशा संकटांमधून बाहेर काढू शकते, अशी संशोधने अनेक तज्ज्ञांनी प्रसिद्ध केलेली आहेत. पुन्हा 18 व्या शतकापासून या प्राकृतिक चिकित्सेवर जर्मनीत काम सुरू झाले. अनेक शास्त्रज्ञांनी अक्षरशः पशु-पक्ष्यांची निरीक्षणे करून या चिकित्सेला पुनर्जन्म दिला आहे.

`महापौरांच्या सहकार्याने उपक्रम’

प्रा. सिन्नरकर म्हणाले की, नाशिकमध्ये 40 हजार नागरिकांना जलनेतीचे प्रशिक्षण देऊन, जलनेतीची पात्र नि:शुल्क वाटपाचे कार्य आमच्या सर्व टीमने महापौर आदरणीय सतीश नाना कुलकर्णी व इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशनच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पाडले, हे अभिमानास्पद आहे. सर्व नागरिकांना याचा निश्चितच फायदा होणार आहे.

`कौन बनेगा स्वास्थ्य रक्षक’ ही संकल्पना
इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशनतर्फे महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष शिवानंद स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम हाती घेतले आहेत. त्यात `कौन बनेगा स्वास्थ्य रक्षक’ ही संकल्पना व त्यावर आधारित विविध उपक्रम सुरू आहेत. प्राकृतिक चिकित्सा व योगाचा प्रसार व्हावा यासाठी ही सर्व धडपड आहे.
– प्रा. तस्मिना शेख, संयुक्त सचिव – उत्तर महाराष्ट्र, इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.