एकात्मिक बीए-बीएड व बीएस्सी-बीएड आणि शैक्षणिक धोरण 2020

0

महाराष्ट्र राज्य मंडळाची बारावीची परीक्षा थोड्या दिवसात संपत आहे आणि बारावीनंतर पुढे काय ? असा प्रश्न पालक व विद्यार्थ्यांना भेडसावणार आहे किंबहुना काहींनी त्या दिशेने विचार करायला सुरुवातही केली आहे. भविष्याचा विचार करून करिअरच्या दिशा ठरवताना पालक व विद्यार्थ्यांनी शैक्षणिक धोरण 2020 च्या शिफारशींचा विचार करून पुढील निर्णय घ्यावा असा निर्णय घेणे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने फायदेमंद हितदायी ठरणार आहे.  शैक्षणिक धोरण 2020 ने उच्च शिक्षणामध्ये एकात्मिक अभ्यासक्रमावर अधिक भर टाकला आहे. विद्यार्थी एकाच वेळी विविध शाखांचा अभ्यासक्रम निवडू शकणार आहे.  शिक्षणानंतर प्रशिक्षण असे न राहता शिक्षण व प्रशिक्षण एकाच वेळी घेता येणार आहे.  वेळेचा अपव्यय टाळून स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे विविध मार्ग खुले होणार आहेत. अशाच एकात्मिक बी. ए. व बी. एस्सी. – बी. एड. अभ्यासक्रमावर प्रकाशझोत टाकणारा हा लेख आहे.

– प्रा. स्मिता अर्जुन बोराडे
अशोका कॉलेज ऑफ एज्युकेशन, नाशिक.

       आजचा पालकवर्ग व विद्यार्थी परंपरागत शिक्षणाकडून अद्यावत शिक्षणाकडे सरसावत आहे आणि ती काळाची गरजही आहे. एकीकडे वैयक्तिक कारणास्तव जे शिक्षण पूर्ण करू शकले नाहीत ते दूरस्थ शिक्षणाचा मार्ग निवडतात तर दुसरीकडे प्रतिभावंत विद्यार्थी कमीत कमी वेळात जास्त अभ्यासक्रम कसे पूर्ण करू शकतील, असा मार्ग शोधतात अशा सर्वच प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी एकात्मिक अभ्यासक्रम उत्तम पर्याय ठरू शकतो.
एकात्मिक बीए – बीएड व बीएस्सी-बीएड हा अभ्यासक्रम शिक्षण व प्रशिक्षण एकाच वेळी पूर्ण करतो. या अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी किमान शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण असावी. या अभ्यासक्रमासाठी बारावी कला व विज्ञान शाखेतील विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. हा अभ्यासक्रम सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठाने संरचीत केलेला आहे. ज्यामध्ये बीए आणि बीएड या दोन्ही अभ्यासक्रमांचे एकत्रिकरण केले आहे. या अभ्यासक्रमाचा कालावधी चार वर्षाचा आहे. हे दोन्ही अभ्यासक्रम स्वतंत्ररीत्या पूर्ण करायचे असले असेल तर पाच वर्षाचा कालावधी लागतो परंतु एकात्मिक अभ्यासक्रम हा चार वर्षातच पूर्ण होतो. तसेच विद्यार्थी आपला आवडीच्या विषयात विशेषीकरण करू शकतो.
         एकात्मिक बीएस्सी-बीएड या अभ्यासक्रमासाठी बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. या अभ्यासक्रमात बीएससी आणि बीएड या दोन्ही अभ्यासक्रमाचे एकत्रीकरण केले आहे. या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी आपल्या आवडीनुसार भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतिशास्त्र व वनस्पतिशास्त्र या विषयात विशेषीकरण करू शकतात. दोन्ही अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी भविष्यात उच्चस्तर पदवीला प्रवेश घेऊ शकतात, स्पर्धा परीक्षा देऊ शकतात किंवा शिक्षकी पेशामध्ये पदार्पण करून शिक्षक होऊ शकतात.
या अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा  महाराष्ट्र राज्य यांनी प्रवेश पात्रता परीक्षा (CET) अनिवार्य केली आहे. प्रवेश पात्रता परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी विद्यार्थी https//cetcell.mahacet.org/ या संकेतस्थळावर जाऊन फॉर्म भरू शकतात. संकेतस्थळाची लिंक ०३ मार्च 2023 पासून सुरु झाली आहे.अधिक माहितीसाठी संपर्क   :
प्रा. स्मिता बोराडे : 9359299122
डॉ. रेखा पाटील :  ९४२३६५६४३६
संकेतस्थळ : https://www.aef.edu.in/ace/
‘अशोका कॉलेज ऑफ एजुकेशन ,नाशिक  

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.