भारतीय भूलतज्ञ संघटनेच्या आरोग्य दिंडीला उदंड प्रतिसाद

0
नाशिक : प्रतिनिधी
भारतीय भूलतज्ञ संघटनेच्या महाराष्ट्र राज्य शाखा यांच्या संकल्पनेतून साकारलेली आरोग्य दिंडी उत्साहात पार पडली. यावर्षी भारतीय भूलतज्ञ संघटनेला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ही आरोग्यदिंडी जनजागृतीसाठी आयोजित करण्यात आली होती.
 भारतीय भूलतज्ञ संघटनेच्या नाशिक शाखेतर्फे आयोजित आरोग्यदिंडीची सुरुवात गोविंदनगर येथील संघटनेच्या वाहतूक बेटापासून झाली. त्यानंतर गोल्फ क्लब येथील जेष्ठ्य नागरिक हास्यक्लब तसेच नाशिक सायकलिस्ट असोसिएशन यांच्या रक्तदान शिबिराच्या ठिकाणी जीवनसंजीवनी क्रियेचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. या प्रात्यक्षिकाचा 100 पेक्षा अधिक लोकांनी लाभ घेतला. या आरोग्यदिंडीसाठी पदाधिकारी डॉ. निलेश ततार, डॉ. निनाद चोपडे, डॉ. जयश्री साळी, डॉ. विक्रम सोनवणे यांनी विशेष परिश्रम घेतले. नाशिकमधील जेष्ठ्य भूलतज्ञ डॉ. वसंत बेळे, डॉ. विवेक काकतकर, डॉ. पूनम शिवदे, डॉ. हितेंद्र महाजन, डॉ. पंकज गुप्ता, डॉ. अनिता नेहेते, डॉ. मंजिरी मदनुरकर, डॉ. प्रशांत देवरे, डॉ. निकिता पाटील इत्यादी मान्यवर सहभागी होते. राज्य शाखेच्या अध्यक्षा डॉ. मनीषा काटीकर यांच्या संकल्पनेतून साकारलेली आरोग्यदिंडी राज्यातील 32 शहरांमध्ये एकाच दिवशी एकाच वेळी उत्साहात पार पडली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.