प्रतिनिधी : नाशिक
राजीवनगर, विशाखा कॉलनी येथील श्री कृष्णमंदिर, व समर्थ महिला मंडळ, तसेच श्रीमती पुष्पावती चॅरीटेबल ट्रस्ट अंतर्गत कार्यरत असणाऱ्या अभिलाषा निसर्ग व योगोपचार केंद्रामार्फत भारतीय स्वातंत्रदिन उत्साहात साजरा करण्यात आला. कृष्ण मंदिराच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले.
भारतीय सैन्यदलातून सेवानिवृत्त सैनिक विनायक खैरनार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष आभार व्यक्त केले की, प्रथमच हर घर तिरंगा या अभियानामुळे प्रत्येक भारतीय नागरीकाच्या मनात देशप्रेम जागृत होण्यास मदत झाली.
ट्रस्टच्या अध्यक्ष डॉ. तस्मीना शेख यांनी राष्ट्रीय दिवसाचे महत्त्व समजावून सांगितले व देशभक्तिपर गीत सादर केले.
समीक्षा शिंदे हिने राणी लक्ष्मीबाई वेशभूषा करून मेरी झांसी नही दूंगीची कृति केली. कार्यक्रमास जेष्ठ्य नागरीक व बालगोपाळांचा उत्साह अवर्णनीय होता.
यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष रणजित पाटील, ट्रस्टच्या सचिव सुनिता पाटील, सदस्य ऐनुद्दीन शेख, सुरेखा महाले, कमिटी सदस्य पुरूषोत्तम सावंत, शलाका सावंत, यू. के. अहिरे, जीवराम गावले, अशोक पाटील, प्रसाद कुलकर्णी, नवनाथ शिंदे, सुधीर कुलकर्णी, भालचंद्र शुक्ल, किरण कोराटे, गौरव चौधरी, सुभाष पगार, सुनील शिंदे, तसेच कॉलनीतील नागरिक उपस्थित होते.
—