नाशिक : प्रतिनिधी
श्री दत्त जयंती व भगवान महाराज माऊली यांचा जन्मदिन सोहळा येथील शिवगोरक्ष योगपीठ संस्थान येथे धार्मिक कार्यक्रमांसह उत्साहात झाला. यावेळी शिवानंद महाराज यांनी संयोजन केले. याप्रसंगी सेवानिवृत्त प्रा.पी. डी कुलकर्णी, सेवानिवृत्त मुख्याध्यापक व योगशिक्षक संघटनेचे पदाधिकारी यू. के. अहिरे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक व योगशिक्षक संमेलनाचे माजी अध्यक्ष अशोक पाटील, पुष्पावतीबाई चॅरीटेबल ट्रस्टचे उपाध्यक्ष रणजीत पाटील, सचिव सुनीता पाटील, सेवानिवृत्त डीवायएसपी विजय सोनवणे आदींचा भगवद्गीता देवून सन्मान करण्यात आला.
इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशनच्या महाराष्ट्र शाखेच्या सहसमन्वयिका व पुष्पावतीबाई चॅरीटेबल ट्रस्टच्या अध्यक्ष डॉ. तस्मिन शेख यांनी केबीएसआर इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनद्वारे केले जाणारे कोण बनेगा स्वस्थ रक्षक या विषयावर सर्वांना माहिती दिली. स्वामी शिवानंद महाराज यांनी परिचय करून देत कौन बनेगा स्वास्थ्य रक्षक परीक्षेत उत्तम गुण घेतल्याने सेवानिवृत्त प्रा. पी. डी. कुलकर्णी आणि सेवानिवृत्त डीवायएसपी विजय सोनवणे यांचा सत्कार केला.
—