नाशिक : प्रतिनिधी
पहिले पंतप्रधान भारतरत्न पं. जवाहरलाल नेहरू यांची 132 वी जयंती ॲड. उत्तमराव ढिकले पंचवटी सार्वजनिक वाचनालयात साजरी झाली.
याप्रसंगी वाचनालयाचे प्रमुख कार्यवाह ग्रंथमित्र नथुजी देवरे यांनी स्वागत केले. हिरालाल परदेशी यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डॉ. शांताराम रायते यांनी आभार मानले. याप्रसंगी धनंजय धनवटे, ग्रंथपाल योगिता भामरे, निकेतन शिंदे, अनिता भुबंक आदींसह विद्यार्थी, वाचक उपस्थित होते.
—