नाशिक : प्रतिनिधी
येथील धम्मगिरी सामाजिक सांस्कृतिक संस्था संचलित धम्मगिरी योग महाविद्यालयाचा कोनशिला अनावरण समारंभ व गुणवंतांचा सत्कार समारंभ आज (शनिवारी, दि.10 सप्टेंबर) सायंकाळी पाच वाजता होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे असतील. प्रमुख मार्गदर्शक म्हणून योग समुपदेशक प्रा. राज सिन्नरकर व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे संचालक डाॅ. जयदीप निकम असतील.
तसेच डाॅ. संजय जाधव, डाॅ. श्रीकांत खरे, डाॅ. काजल पटनी, यू. के. अहिरे, मोहन चकोर, डाॅ. नानासाहेब खरे, मिलिंद गणकर, अशोक पाटील यांची प्रमुख उपस्थिती असेल. या कार्यक्रमाचे आयोजक संस्था अध्यक्ष कैलास जाधव, सचिव डाॅ. पल्लवी जाधव, प्राचार्य जगदीश मोहुर्ले, उपप्राचार्य प्रा. राजेंद्र काळे, तर मार्गदर्शक डाॅ. विशाल जाधव, समन्वयक गीताताई गायकवाड हे आहेत.
या कार्यक्रमास मायको एम्प्लॉईज फोरम, अत्त दीप भव, कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालय, मेडीकोज सोशल वेल्फेअर असोसिएशन, जिवक नर्सिंग महाविद्यालय यांचे सहकार्य लाभले आहे. हा कार्यक्रम कविवर्य नारायण सुर्वे वाचनालय (मायको हाॅल), सिंहस्थनगर येथे होणार आहे.
—