योगदा सत्संग सोसायटी ऑफ इंडियाचे संस्थापक आणि ‘योगी कथामृत’ या सुविख्यात, अभिजात आध्यात्मिक ग्रंथाचे लेखक श्री श्री परमहंस योगानंद यांचे गुरू स्वामी श्री युक्तेश्वर गिरी यांच्या १६७ व्या अविर्भाव दिनानिमित्त योगदा सत्संग ध्यान मंडळी नाशिक यांच्या वतीने मंगळवारी (दि. १० मे २०२२) रोजी सायंकाळी 06:30 वाजता 52, सोहम बंगला, सहजीवन कॉलोनी, कॅनडा कॉर्नर, नाशिक येथे विशेष सत्संग आणि ध्यान सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. सदरचे सत्संग आणि ध्यान सत्र सर्वांसाठी खुले आहे.
स्वामी श्री युक्तेश्वरजींनी त्यांचे प्रमुख शिष्य योगानंदजी यांना दिलेले प्रशिक्षण कठोर आणि काटेकोर असले, तरी सर्व बाबतीत परिपूर्ण होते. या प्रशिक्षणाद्वारे स्वामी श्री युक्तेश्वरजींनी योगानंदांना क्रिया योगाचे ज्ञान भारतातील आणि संपूर्ण जगातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, उत्तुंग आध्यात्मिक उंची गाठण्यास सक्षम केले. “क्रिया योग हे ते साधन आहे, ज्याद्वारे मानवी उत्क्रांती जलद होऊ शकते” असे श्री युक्तेश्वरजी म्हणाले. हे एक अचूक विज्ञान आहे, जे मानवजातीला शरीर, मन आणि आत्मा यांची शुद्धता प्राप्त करण्यासाठी आणि त्याचा निष्ठापूर्वक सराव करणाऱ्याला अखेरीस ईश्वराशी एकरूपता साधण्यास सक्षम करते.