योगाच्या सर्वोच्च विज्ञानाचे स्तुतीपर गीत

आंतरराष्ट्रीय योग दिन विशेष

0

शारीरिक तप करणाऱ्या हटयोग्यापेक्षा योगी श्रेष्ठ मानला जातो. अगदी ज्ञानमार्गाच्या किंवा कर्ममार्गाच्या अनुयायांपेक्षाही तो महान असतोम्हणून, हे अर्जुना तू योगी हो! – भगवदगीता-6:46.

       श्री श्री परमहंस योगानंदजींनी त्यांचे “ईश्वर-अर्जुन संवाद” हे ऋषी व्यासांच्या भगवदगीतेवरील विस्तृत भाष्य जेव्हा प्रत्येक प्रामाणिक साधकामधील अर्जुनरूपी भक्ताला समर्पित केले, तेव्हा त्यांनी दैवी अवतार श्रीकृष्णाने सर्वोच्च आध्यात्मिक मार्ग म्हणून राजयोगाची केलेली स्तुती आणि इतर कोणत्याही मार्गाच्या अनुयायांपेक्षा वैज्ञानिक मार्गावरील योग्याला दिलेला श्रेष्ठ दर्जा, यांना दुजोराच दिला आहे.

संथ, अनिश्चित, बैलगाडीच्या वेगाने ईश्वराकडे जाणाऱ्या धर्मशास्त्रीय मार्गाच्या तुलनेत, योगविद्या किंवा प्राणायाम हा दैवी साक्षात्काराच्या अनुभूतीचा थेट, सर्वात जवळचा, ‘ विमान’ मार्ग आहे. ‘हे एक असे साधन आहे ज्याच्या योगे मानवी उत्क्रांतीची गती वाढवता येते.’

क्रियायोगाच्या वैज्ञानिक तंत्राची प्रामाणिकपणे साधना करणारा योगी, क्रमाक्रमाने कर्माच्या म्हणजेच “कार्यकारण परंपरेच्या समतोल शृंखलेतून” कसा मुक्त होतो, ते योगानंदजींनी त्यांच्या“योगी कथामृत” या अभिजात आध्यात्मिक पुस्तकामध्ये समजावून सांगितले आहे.

गीतेमध्ये श्रीकृष्णांनी दोनवेळा उल्लेख केलेले क्रियायोगाचे प्राचीन विज्ञान, हिमालयातील अजरामर योगी, महावतार बाबाजी, यांनी पुन्हा शोधले आणि सुस्पष्ट केले.

       “या एकोणिसाव्या शतकात मी तुझ्यामार्फत या जगाला जो क्रियायोग देतो आहे, तो त्याच विज्ञानाचे पुनरुज्जीवन आहे, जे सहस्त्रावधी वर्षांपूर्वी कृष्णाने अर्जुनाला दिले; आणि पुढे पतंजली, येशू ख्रिस्त यांनाही माहीत झाले होते.”  बाबाजींनी हे मुक्तिदायक सत्य त्यांचे शिष्य लाहिरी महाशय यांना सांगितले. त्यांनी तेच तंत्र विविध उन्नत शिष्यांना शिकविले, त्यांच्यापैकी एक योगानंदजींचे गुरू स्वामी श्री युक्तेश्वर गिरी होते.
योगायोगाने, 1894 मध्ये कुंभमेळ्यात स्वामी श्री युक्तेश्वरांना बाबाजी भेटले होते. तेव्हा बाबाजींनी वचन दिले होते की, योगशास्त्राचे प्रशिक्षण देण्यासाठी ते एक शिष्य स्वामी श्री युक्तेश्वरांकडे पाठवतील. जो नंतर ह्याच शिकवणीचा पाश्चिमात्य देशात प्रसार करेल. “अध्यात्माचा शोध घेणाऱ्या अनेक मुमुक्षू आत्म्यांच्या स्पंदनांचा ओघ माझ्याकडे येत आहे.” त्यांनी दयाळूपणे सांगितले.
मुक्त झालेल्या महात्म्यांच्या उद्देशानुसार, क्रियायोगाचे प्राचीन विज्ञान, त्याच्या शुद्ध आणि मूल स्वरुपात जगासमोर आणण्यासाठी जेव्हा योगानंदजींनी योगदा सत्संग सोसायटी ऑफ इंडिया/सेल्फ-रीअलाइझेशन फेलोशिपची शंभर वर्षांपूर्वी स्थापना केली, तेव्हा त्या दैवी वचनाची पूर्तता झाली.
पाठीच्या कण्यातील ज्या मार्गिकेतून आत्मा शरीरात उतरला आहे, त्यातूनच अहंकार, मन आणि प्राणशक्ती यांना क्रियायोगाची निष्ठापूर्वक साधना घेऊन जाते. अशाप्रकारे मेरूदंडातील मार्गिका म्हणजे “पृथ्वीवर अवतरलेल्या सर्व नश्वर प्राणिमात्रांनी मुक्तीच्या आरोहणासाठी अवलंबिण्याचा एक सरळ महामार्ग आहे” असे योगानंदांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

खरा योगी ईश्वराशी आंतरिक एकरूपता साधेपर्यंत ध्यान करतो, अशा प्रकारे त्याच्या बाह्य जगातील क्रिया किंवा सेवा अहंकाराने प्रेरित नसतात तर आंतरिक आणि बाह्य दोन्ही जीवनातील अगदी बारीकसारीक गोष्टींतसुद्धा स्वेच्छेने केलेले ईश्वरी इच्छेचे पालन असतात.

खरा योगी जाणतो की ईश्वर “नित्य-अस्तित्वात आहे, नित्य चैतन्यमय आहे, नित्य नवीन आनंद” आहे.  स्वामी श्री युक्तेश्वरजी पुढे आग्रहपूर्वक सांगतात, “प्राचीन योगीजनांनी शोधून काढले की, वैश्विक जाणिवेचे रहस्य श्वासाच्या नियंत्रणाशी अत्यंत निगडित आहे. उच्च प्रतीच्या क्रियाकर्मांसाठी प्राणशक्तीला श्वासाची निरंतर आवश्यकता थांबवण्याच्या पद्धतीद्वारे मुक्त करणे आवश्यक आहे.

अशाप्रकारे योगविद्या हे केवळ ध्यानाचे विज्ञान नाही, तर ते आत्म-परिवर्तनाचे म्हणजेच शरीराने बद्ध असलेल्या स्वत:ला (अहंकाराला) शुद्ध दैवी परमात्म्यात परिवर्तित करण्याचे विज्ञान आहे. आज या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपण मानवी उत्क्रांतीचे हे विशुद्ध ज्ञान विश्वासमोर आणण्याच्या प्राचीन भारताच्या भूमिकेचा पुरस्कार करूया. अधिक माहितीसाठी : yssofindia.org

– लेखिका: संध्या एस. नायर

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.