मानवी हक्कांवरील अतिक्रमण टाळण्याची जबाबदारी प्रत्येकाची : प्रा. महाले

त्र्यंबकेश्वर महाविद्यालयात मानवी हक्क दिनानिमित्त कार्यक्रम

0
नाशिक, (वा.)
मानवी हक्क हे नैसर्गिक हक्क असून त्यावरील संकट टाळण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे. त्याची जोपासना करणे काळाची गरज बनली आहे, असे प्रतिपादन इगतपुरी महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. भागवत महाले यांनी केले.
त्र्यंबकेश्वर महाविद्यालयात आयोजित मानवी हक्क दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. ए. के. शिंदे होते. यासंगी व्यासपीठावर प्रा. संदीप गोसावी, डॉ. शरद कांबळे, डॉ. मिलिंद थोरात उपस्थित होते.

त्र्यंबकेश्वर महाविद्यालयात मानवी हक्क दिनानिमित्त झालेल्या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना प्रा. भागवत महाले. समवेत व्यासपीठावर प्राचार्य डाॅ. ए. के. शिंदे, प्रा. संदीप गोसावी, डॉ. शरद कांबळे, डॉ. मिलिंद थोरात.

प्रा. महाले  म्हणाले, विश्वात प्रत्येक नागरिकांचे नैसर्गिक हक्क धोक्यात आले आहे. ते जोपासायचे असेल तर स्वतः पासून सुरुवात करणे गरजेचे आहे. प्रत्येक व्यक्तीचे स्वातंत्र्य अबाधित राहावे आणि हे हक्क कोणालाही हिरावून घेण्याचा अधिकार नाही. हक्काचे उल्लंघन, निर्वासितांचा प्रश्न, अल्पसंख्यांकांवर होणारे अन्याय, अत्याचार थांबवले पाहिजे. मानवाधिकार हे वंश, लिंग, राष्ट्रीयत्व, भाषा, धर्म, वय अन्य कोणताही भेदभाव न करता सर्व माणसांसाठी अंतर्भूत हक्क आहेत. म्हणून प्रत्येक व्यक्तीने  कर्तव्य सांभाळले पाहिजे.

प्राचार्य डाॅ. शिंदे म्हणाले की जागतिक मानवी हक्क दिन साजरा करण्याची वेळ आपणच आणलीय आहे. व्यक्ती-व्यक्तीमधील मानसन्मान, आदर प्रतिष्ठा दुरावत असल्याने मोठे संकट उभे राहिले आहे. मानवी प्रवृत्तीने आर्थिक लोभापायी इतरांचे अधिकार हिरावले आहेत.
प्रा. संदीप गोसावी, प्रा. डॉ. मिलिंद थोरात यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास डॉ. नितीन बोरसे, डॉ. अजित नगरकर, डॉ. अशोक भवर, प्रा. मनोहर जोपळे, प्रा. नीता पुणतांबेकर, प्रा. सुलक्षणा कोळी, प्रा. एस. एस. खाडे, प्रा. ज्ञानेश्वर माळे, प्रा. नीलेश म्हरसाळे, मयूर कुटे यांनी परिश्रम घेतले. डॉ. मिलिंद थोरात यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. संदीप गोसावी यांनी आभार मानले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.