नाशिक : प्रतिनिधी
मविप्र समाजाच्या होरायझन अकॅडमी, सुळेवाडी रोड, मखमलाबाद येथे कोविडच्या नियमांचे पालन करून इयत्ता १ ली ते ७ वीच्या विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी प्राचार्या सोनाली गायकर यांनी विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.
यावेळी सॅनिटायझरचा, मास्कचा वापर, तसेच सुरक्षित अंतर ठेवून विद्यार्थ्यांनी नियमपालन केले. विद्यार्थ्यांमध्येही उत्साह होता. मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते.
—