नाशिक : प्रतिनिधी
मविप्र समाज संस्थेच्या होरायझन अकॅडेमी, मखमलाबाद येथे `जिजाऊ ते सावित्री – सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचाʼ हे अभियान राबविण्यात आले. या दरम्यान विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांत सक्रिय भाग घेतला.
या उपक्रमात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांची वेशभूषा करून त्यांच्याविषयी माहिती सांगण्यात आली. तसेच निबंध स्पर्धा घेण्यात आली. वॉरियर्स यशस्वी महिला यांचा सत्कार करून त्यांची मुलाखत घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्यावर पोवाडा गायन केले. विद्यार्थ्यांनी `आजची सावित्री, मी जिजाऊ बोलते..ʼ, मला फुलू द्या, असे विविध विषय घेऊन एकांकिका सादर केल्या. विद्यार्थ्यांनी मातीचे वेगवेगळे किल्लेही बनविले.
याप्रसंगी विद्यार्थ्यांना शिक्षकांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग बघून प्राचार्य सोनाली गायकर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
—
होरायझन अकॅडेमी, मखमलाबाद येथे `जिजाऊ ते सावित्री – सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचाʼ हे अभियान राबविले
Get real time updates directly on you device, subscribe now.