नाशिक, (वा.)
मविप्र समाज संस्थेच्या होरायझन अकॅडेमी, सुळेवाडी रोड, मखमलाबाद येथील विद्यार्थ्यांनी आयक्यूब या परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन झाले आहे.
अनुष्का कातड, सृष्टी देशमुख या विद्यार्थिनींनी गोल्ड आणि सिल्वर मेडल, तसेच चेक स्वरूपात बक्षीस मिळवून परीक्षेमध्ये यश संपादन केले. तसेच सृष्टी देशमुख, मयुरेश्वर पिंगळे, प्रणव पिंगळे, गार्गी शेळके, वल्लभ देशमुख या विद्यार्थ्यांनीही यश मिळविले आहे. त्यांना परीक्षेसंदर्भात वर्गशिक्षकांनी मार्गदर्शन केले. प्राचार्य सोनाली गायकर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांचा सत्कार केला.
—