नाशिक : प्रतिनिधी
मविप्र समाज संस्थेच्या मखमलाबाद येथील होरायझन अकॅडेमी या शाळेत नाताळनिमित्त विद्यार्थ्यांमध्ये चैतन्याचे वातावरण होते.
याप्रसंगी विद्यार्थ्यांना ख्रिश्चन धर्माची माहिती देऊन येशू ख्रिस्त हे कोण होते, याविषयी माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी छोटीशी नाटिका सादर करून आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले. सांताक्लॉज बनवून आलेल्या मुलांनी जिंगल बेल या गाण्यावर नृत्य करून आनंद घेतला. प्राचार्य सोनाली गायकर यांनी विद्यार्थ्यांचे शाळेमध्ये आल्याबद्दल, तसेच त्यांच्या कलागुणांचे कौतुक केले.
—