परमहंस योगानंदांचा महासमाधीचा स्मृतिदिन वाय.एस.एस. ऑनलाईन ध्यान सत्रांबरोबरच साजरा करते. रांची, 7 मार्च, 2022 : सत्तर वर्षांपूर्वी, 1952 साली अगदी याच दिवशी, परमहंस योगानंदजींनी महासमाधीत प्रवेश केला,एका महान योग्याचे परमात्म्याशी तादात्म्य पावलेल्या अवस्थेत जाणिवपूर्वक केलेले अंतिम निर्गमन. सोमवार, 7 मार्च रोजी योगदा सत्संग सोसायटी ऑफ इंडिया (वायएसएस)द्वारे साजऱ्या केलेल्या या घटनेच्या स्मृतिदिनी, विशेष ऑनलाईन कार्यक्रमांमध्ये 4,000पेक्षा अधिक लोक त्यांच्या घरातून सहभागी झाले. या प्रसंगी ज्येष्ठ वायएसएस संन्यासी, स्वामी वासुदेवानंदगिरी आणि स्वामी लालितानंद गिरी यांनी वायएसएस ऑनलाईन ध्यानकेंद्रावर हिंदी आणि इंग्रजीमध्ये विशेष ध्यानाचे मार्गदशन केले. या सत्रांमध्ये प्रार्थना, प्रेरणादायी वाचन, श्रद्धापूर्ण भजने, आणि मूक ध्यानाचे कालावधी समाविष्ट होते. आणि परमहंस योगानंदजींच्या रोगनिवारक तंत्रांच्या सरावाने त्यांचा समारोप झाला. पश्चिमेकडे योगविद्येचे जनक म्हणून व्यापकपणे ओळखल्या जाणाऱ्या, योगानंदजींनी त्यांचे अभिजात आध्यात्मिक पुस्तक, योगी कथामृत, आणि त्यांच्या अनेक लेखांद्वारे, लक्षावधी पाश्चिमात्य लोकांना, भारताच्या कालातीत आत्मिक विज्ञानाची ओळख करून दिली. आपल्या सत्संगामध्ये स्वामी वासुदेवानंदजींनी महान गुरूंच्या भारतप्रेमावर लक्ष केंद्रित केले. ते म्हणाले, “आमच्या गुरूंचे या पृथ्वीतलावरील शेवटचे शब्द ईश्वर आणि भारत होते. जेव्हा त्यांनी त्यांच्या माय इंडिया या कवितेतून काही ओळी उदधृत केल्या : “जेथे गंगा, जंगले, हिमालयातील गुहा आणि माणसे ईश्वराचे स्वप्न पाहतात – अशा मातीचा स्पर्श माझ्या शरीराला लाभला; मी धन्य झालो आहे.”
परमहंसजींना आधीच माहीत होते की, लवकरच ते देहत्याग करणार आहेत. स्वामी ललितानंदजींनी श्री दया माताजींची (योगानंदजींच्या अगदी निकटच्या शिष्या, ज्या नंतर वाय.एस.एस.च्या तिसऱ्या अध्यक्ष बनल्या.) आठवण सांगितली, ज्यामध्ये त्यांनी या घटनेचा उल्लेख केला आहे. त्यांच्या ऐहिक निर्गमनाच्या थोडेसेच आधी, दया माताजींशी बोलत असताना परमहंसजी म्हणाले होते की, ते लवकरच “त्यांच्या देहाचा त्याग करणार आहेत.” धक्का बसलेल्या दया माताजींनी जेव्हा त्यांना विचारले: “गुरूजी, तुमच्याशिवाय आम्ही काय करणार?” तेव्हा महान गुरूंनी तिला उत्तर दिले : लक्षात ठेवा, मी गेल्यानंतर, फक्त प्रेमच माझी जागा घेऊ शकेल. रात्रंदिवस ईश्वराच्या प्रेमात मग्न रहा, आणि ते प्रेम सर्वांना द्या.”
“अशा प्रेमाआभावी हे जग दु:खाने भरले आहे,” असे दया माताजींनी लिहिल्याचे स्वामी लालितानंदजींनी सांगितले. नंतर त्यांनी ऑनलाईन कार्यक्रमात सहभागी झालेल्यांना आपल्या दररोजच्या ध्यानामध्ये ईश्वर आणि गुरूंना त्यांचे प्रेम आणि श्रध्दा अर्पण करण्याच्या त्यांच्या संकल्पाचे नूतनीकरण करण्यासाठी प्रोत्साहित केले.
योगदा सत्संग सोसायटी ऑफ इंडिया/ सेल्फ रीअलाइझेशन फेलोशिप (वायएसएस/एसआरएफ)च्या मुद्रित पाठमालेद्वारे परमहंस योगानंदजींच्या क्रिया योगाच्या शिकवणी उपलब्ध आहेत. योगानंदजींनी स्थापन केलेल्या या दोन संस्थांमध्ये भारत आणि जगभरात 800हून अधिक आश्रम, केंद्रे आणि मंडळे आहेत. अधिक माहितीसाठी : yssi.org/PY वर संपर्क करा.