नवी दिल्ली : दक्षिण अंदमान समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे ३० नोव्हेंबरपासून तामिळनाडूमध्ये पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने (IMD) दिली आहे. मात्र तोपर्यंत तामिळनाडूसह इतर दक्षिणेकडील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो. देशात हलक्या थंडीला (Winter) सुरुवात झाली असून अनेक ठिकाणी थंडीबरोबरच धुके (Fog) पडू लागले आहे. पण दक्षिणेकडील राज्यांमध्ये पुन्हा एकदा पावसाची (Rain) शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
—