नाशिक : प्रतिनिधी
म्हसरूळ येथील श्री स्पंदन फाऊंडेशनतर्फे स्पंदन स्पेशालिटी हेल्थ क्लिनिक व शिवसेना वैद्यकीय आघाडी यांच्या समन्वयाने श्री रामनवमीनिमित्त रविवारी दि.10) आरोग्य शिबीर व रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे, अशी माहिती डॉ. पंकज वाल्हेकर यांनी दिली.
सकाळी १० ते १ वाजेपर्यंत स्पंदन स्पेशालिटी हेल्थ क्लिनिक, एस्सार पेट्रोल पंपाच्यामागे, साईबाबा मंदिर समोर, म्हसरूळ येथे हा उपक्रम होईल. या शिबिरात रक्तातील साखरेचे प्रमाण, रक्तदाब तपासणी, पायातील नसांची तपासणी, रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण, बॉडी मास इंडेक्स आदी तपासण्या होतील. याप्रसंगी तज्ज्ञ डॉक्टरांतर्फे मार्गदर्शन केले जाणार आहे.
सर्व वयोगटातील लोक या तपासणी शिबिराचा लाभ घेता येईल, असे संयोजकांनी सांगितले.
—