श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचा 27 ऑगस्टपासून मार्गदर्शन सोहळा

0

नाशिक : प्रतिनिधी
श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचा समस्या मार्गदर्शन, प्रवचन व दर्शन सोहळ्याचे आयोजन 27 ऑगस्टपासून जनम संस्थानाच्या रामशेज किल्ल्याजवळील आशेवाडी येथील उत्तर महाराष्ट्र उपपीठ आश्रमात करण्यात आले आहे. श्रावण मासात हा सोहळा आल्याने या  सोहळ्यास  हजारो भाविक दर्शनासाठी येण्याचा अंदाज आहे. दिंडोरी तालुका सेवा समितीतर्फे ही माहिती देण्यात आली.
दोन दिवस असणाऱ्या या सोहळ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २७ ऑगस्टला सकाळी नऊ वाजेपासून समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळा होणार आहे. याच दिवशी नवीन साधकांना साधक दिक्षा दिली जाणार आहे. उपपीठावर बांधण्यात आलेल्या सभागृहाचे लोकार्पण दिनांक २८ ऑगस्टला जगद्गुरू श्रींच्या हस्ते होणार आहे. नंतर सिद्ध पादुका असलेल्या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मिरवणुकीनंतर  माऊलींच्या सिद्ध पादुकांचे विधीवत पूजन करून पादुका स्थापना करण्यात येणार आहे.
सामाजिक व अध्यात्मिक कार्य करणाऱ्या जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या समस्या मार्गदर्शन,  प्रवचन व दर्शन सोहळ्याचा लाभ भाविकांनी घेऊन त्यांचे मौलिक विचार ऐकावे, असे आवाहन जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानाच्या दिंडोरी तालुका सेवा समितीतर्फे करण्यात आले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.