सामान्य आजार आणि योग व निसर्गोपचार : सायटिका

0

सायटिका

सायटिका हा कमरेचा सांधा या ठिकाणचे पाठीचे मणके व पायाची नस यांचा हा संयुक्त आजार आहे. हा आजार कमरेपासून तर पायाच्या बोटांपर्यंत असतो. थोडक्यात नस दाबणे म्हणजे सायटिका होय.

 लक्षणे

कमरेमध्ये हळूहळू वेदना वाढत जाणे, पायाच्या मागील बाजूस वेदना जाणवणे, बसल्यानंतर पायाच्या मागील बाजूस जास्त वेदना होणे, मांडीचा सांधा या खाली वेदना होणे. पायामध्ये जळजळ, आग किंवा मुंग्या येणे, पायाच्या एका बाजूस उदा. करंगळी पायाची बाहेरील बाजू, अंगठा, पायाची आतील बाजू यापैकी एका बाजूस जास्त दुखणे, उठता बसता पाय व कंबरेस वेदना व चमक एकाच वेळेस दोन्ही प्रकारचा त्रास होणे म्हणजे सायटिका होय.

कारण

सायटिका होण्याची कारण वेगवेगळे आहे. त्यामध्ये प्रमुख उभे राहण्याची पद्धत जर चुकीची असेल तर उदा : जास्तीत जास्त वेळ एका पायावर जास्त भार देऊन उभे राहणे किंवा खुर्ची, पलंग, सोफा यावर बसताना मांडीवर मांडी ठेवून तिरपे बसणे, खाली वाकून जास्तीत जास्त वजन नेहमी उचलणे, गृहिणींच्या बाबतीत स्वयंपाक घरात उभे राहणे, धुणी-भांडी करताना चुकीचे बसणे, शेतमजुरांच्या बाबतीत चुकीच्या पद्धतीने वाकणे, गवत खुरपणी विशेषतः गवत उपटताना चुकीचे उभे राहून खाली वाकणे व ताकद लावणे यातून सायटिका निर्माण होतो. मोटार सायकलवर नेहमी प्रवास करणारी चुकीच्या पद्धतीने बसणे व प्रवास करणे, तसेच मोटरसायकलला एका बाजूने काहीतरी साहित्य ओझे अडकविल्याने मोटरसायकल चालकास एका बाजूने (Balance) संतुलन टिकवण्यासाठी बैठकीचे आयोजन अनैसर्गिक केल्याने सायटिकाचा त्रास मोठ्या प्रमाणात जाणवतो. सायटिकाची रुग्णाची नर्व (नस) यातील अडथळा, दाब, दबाव यामुळे वेदना सुरू होऊन या वेदना पाठीच्या व कंबरीच्या सांध्यापासून सुरू होऊन मांडीचा सांधा. कमरेचा खुबा या पासून पायाच्या शेवटच्या अंगापर्यंत वेदना होणे म्हणजे सायटिका होय. बदलती जीवनशैली, अनुभवाची कमतरता व परिणामांची पर्वा न करणे, लठ्ठपणा यातून सायटिका जन्माला येतो.

उपचार

हा आजार जडल्यास रुग्ण सर्वप्रथम डॉक्टरांकडे धाव घेतो. डॉक्टर सर्वप्रथम वजन कमी करण्याचा सल्ला देतात. नैसर्गिक जीवनशैली अंगीकारणे व तिचे पालन करणे महत्त्वाचे आहे. सायटिका मध्ये ऑपरेशन हा विकल्प सर्वात शेवटी आहे. यामध्ये योग निसर्गोपचार महत्त्वाची भूमिका बजावतो.

योगोपचार

सूर्यनमस्कार  बारा सूर्यनमस्कार दररोज करणे आवश्यक आहे.

आसन-

उभ्या स्थितीत– ताडासन, कठीचक्रासन, त्रिकोणासन, कोणासन.

बैठा स्थितीत– वज्रासन,वक्रासन, अर्ध मत्सेंद्रासन, उष्ट्रासन, कुर्मासन, उत्तान मंडूकासन,

पाठीवरील आसन अर्धहलासन, पवन मुक्तासन, विपरीत करणी.

पोटावरील आसन एक पाद व द्विपाद शलभासन, धनुरासन, भुजंगासन, सर्पासन तीन वेळेस करावे.

अधोमुख श्वानासन, शलभासन हेही तीन वेळेस करावे.

क्रिया- कपालभाती, वमन, शंख प्रक्षालं करावे. पोट साफ ठेवावे

प्राणायाम नाडीशोधन, सूर्यभेदन, भस्रिका यांचा अभ्यास करावा.

ध्यानधारणा– प्रणव ओंकार उच्चारण करावे.

निसर्गोपचार

1)       कटी स्नान, बाष्प स्नान, मसाज, गार-गरम पाणी शेक द्यावा.
2)       थंड गरम पाणीपट्टी कमरेवर ठेवावी.
3)       उपवास चिकित्सा करून वजन कमी करावे.
4)       आहारात कडधान्य, शाक भाजी, पोळी, हलका आहार व ताक मोठ्या प्रमाणात घेऊन पेरू, पपई, खरबूज, टरबूज घ्यावे.

वर्ज सायटिका मध्ये विश्रांती आवश्यक असल्याने कष्टदायक कार्य करू नये, उंच टाचांचे चप्पल वापरू नये, पुढे झुकणे टाळावे, मैदा व साखरेचे पदार्थ खाऊ नये. यामुळे तंत्रिका तंत्रास हानी पोहोचते. धूम्रपान करू नये, प्रवास टाळावा, मोटार सायकल व इतर ड्रायव्हिंग करू नये.

– प्रा.डॉ.राजेंद्र वामन
योग विभाग प्रमुख
संगमनेर महाविद्यालय,संगमनेर
मेल:rajendrawaman@rediffmail.com
मोबाईल नंबर: ९८२२४५०७६

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.