सामान्य आजार आणि योग व निसर्गोपचार : कावीळ   

0

कावीळ  

या विकारात लघवीचा रंग पिवळा होतो. यानंतर हळूहळू डोळे, नखे तसेच त्वचेचा रंग पिवळा होतो. एवढेच नाही तर या विकारात रोग वाढल्यानंतर सर्वकाही पिवळे दिसते.

लक्षणे
खाज, हलका ताप, बैचेनी, चीडचीडेपणा, उलटी असे लक्षणे दिसून येतात. तोंड कडू पडते. गोड आणि तेलकट खाण्याची इच्छा होत नाही. रोग्याचा स्वभाव सुद्धा कडू होण्यास मदत होते. यामध्ये व्यवस्थित झोप येत नाही. जेवणात चव लागत नाही. पोट खराब होते. २४ तासात रोगी जे खातो, पितो ते सर्व बाहेर येते. फळे व त्यांचा रस, पाणी बाहेर पडते. उजव्या खांद्याच्या खाली थोडे दुखण्यास सुरुवात होते. यात थंडी वाजून येते.

कारण
या रोगाचे मुख्य कारण यकृत दोष आहे. अर्थात यकृताचे कार्य व्यवस्थित होत नाही व यकृत जे पित्त तयार करते व काही अड्थळ्यामुळे ते छोट्या आतड्यात येण्याऐवजी रक्तात मिसळले जाते.आणि रक्त परीवहनाद्वारे ते संपूर्ण शरीरात पसरते. अशा अवस्थेत पित्ताचा रंग पिवळा असल्याने रोग्याची त्वचा, डोळे, नखे पिवळी पडतात व लघवी पिवळी होते. यकृतातील कार्यप्रणालीत बिघाड निर्माण झाल्याने ते अस्वस्थ होते व त्याला सूज येते. यकृतातील पित्त प्रवाहात अडथळा निर्माण होतो. त्यामुळे पित्त यकृतात साठते व यकृताला अधिक सूज चढते. शेवटी पित्त शरीराच्या रक्तात अधिक प्रमाणात मिश्रित होते व काविळीचे प्रमाण वाढत जाते.

योगोपचार
             आसन- शवासन, हलका व्यायाम

प्राणायाम – दीर्घ श्वसन,

क्रिया-
ध्यानधारणा – प्रणव ओंकार साधना

             योगनिद्रा शवासन  

निसर्गोपचार – या विकारात उपवास चिकित्सा उपयुक्त होते.
1.       सात दिवस केवळ पाणी हे लिंबू किंवा संत्रा एकत्र करून घ्यावे.
2.       फक्त रसदार फळे, गोड फळे आहारात असावी.
3.       एनिमा घ्यावा.
4.       आठ ते दहा दिवसाच्या रसहारानंतर थोडे थोडे जेवण घ्यावे.
5.       यकृताची सूज कमी करण्यासाठी दररोज २०-२५ मिनिटे गरम व थंड पाणी शेक द्यावा.पायांना गरम स्नान तसेच कंबरेला कटीस्नान,तसेच अधूनमधून पित्त जास्त वाटत असेल तर हलके वमन करावे.
6.       उसाचा ताजा रस,रसदार फळे,भाजी व भाज्यांचे सूप, दही, मठ्ठा आहारात घ्यावा. 

वर्ज- अति तेलकट, तुपट, मांस, मटण, मासे, अंडी, मसाले, अल्कोहोल किंवा इतर व्यसन करू नये.

– प्रा. डॉ. राजेंद्र वामन
योग विभाग प्रमुख,
संगमनेर महाविद्यालय,संगमनेर
ई-मेल:rajendrawaman@rediffmail.com
मोबाईल नंबर:९८२२४५०७६८

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.