म्हसरूळ, (वा.)
येथील प्रभाग एकमधील ज्येष्ठ्य सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी गणेश पेलमहाले यांनी आपल्या सामाजिक व राजकीय कार्याचा अहवाल थेट पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे नुकताच सोपविला आहे. त्यावर या नेत्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
या दोन्ही नेत्यांनी हा अहवाल बारकाईने वाचला व समजावून घेतला. त्यानंतर आपण करीत असलेले पक्ष संघटनेचे व सामाजिक कार्य स्तुत्य आहे, अशा शब्दात पेलमहाले यांचे कौतुक केले आहे. नाशिक महापालिका निवडणूक जवळ आली आहे. या पार्श्वभूमीवर या वरिष्ठ नेत्यांकडून मिळालेली प्रतिक्रीया बरेच काही सांगून जात असल्याची नागरिकांत चर्चा आहे.
—