सोपान योग महाविद्यालयाकडून आंतरराष्ट्रीय योगदिन विविध उपक्रमांनी साजरा

0

नाशिक : प्रतिनिधी
येथील धम्मगिरी सामाजिक व सांस्कृतिक संस्थेच्या सोपान योग महाविद्यालयाकडून आंतरराष्ट्रीय योगदिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. शहरातील विविध शाळा, महाविद्यालय, तसेच शासकीय रुग्णालयांत एकदिवसीय योग शिबिर घेण्यात आले.

शिबिरात सूर्यनमस्कार, प्राणायाम आदींचे प्रात्यक्षिक योगशिक्षकांनी सादर केले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांकडूनही करवून घेण्यात आले. याप्रसंगी ‘ध्येय निरामय, निरोगी आयुष्याचे, चढू या सोपान योगाचे’ असा संदेश देण्यात आला. शहरातील डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय, द्वारका, मायको फोरम, केबीएच विद्यालय, वडाळा गाव, मीनाताई ठाकरे स्टेडियम, हिरावाडी, पंचवटी, पेठे माध्यमिक विद्यालय, उंटवाडी येथे योगाची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.

   धम्मगिरी संस्थेचे मार्गदर्शक डॉ. विशाल जाधव यांनी योगाबद्दल असलेले समज, गैरसमज यांसह योगामुळे जीवनशैलीत होणारे बदल यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.

प्राचार्य यू. के. अहिरे यांच्या नेतृत्वाखाली उपप्राचार्य योगशिक्षक राजेंद्र काळे, अशोक पाटील, चैतन्य कुलकर्णी, प्रीती चांदोरकर, अर्चना दिघे, वैशाली खैरनार, ज्योती देवरे, आरती आठवले, नीलेश वडनेरे, छाया झाल्टे, जयश्री जाधव, काशिफ शेख, हर्षल पाटील यांनी प्रात्यक्षिक सादर केले. संस्थेचे अध्यक्ष कैलास जाधव, सचिव डॉ. पल्लवी जाधव, प्रा. राज सिन्नरकर, तुषार विसपुते यांनी उपक्रमासाठी मार्गदर्शन केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.