नाशिक : प्रतिनिधी
पाचव्या प्राकृतिक चिकित्सा दिवसानिमित्त निसर्गोपचार आरोग्य आणि मार्गदर्शन शिबिर येथे झाले. इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन व सूर्या फाउंडेशन व नॅशनल इस्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी आणि आयुष मंत्रालय यांच्यातर्फे हा उपक्रम झाला. याप्रसंगी शिबिरात मोफत निसर्गोपचार व सल्ला देण्यात आला. अभिलाषा निसर्गोपचार केंद्र ,भाभानगर येथे हे शिबीर झाले.
शिबिराचे प्रेरणास्थान आयएनओचे राष्ट्रीय अध्यक्ष अनंत बिरादार, डॉ.सुशांत पिसे, डॉ.पल्लवी दळवी होते. हे शिबिर सकाळी 11ते 2 वाजेदरम्यान झाले. प्रा. डॉ. तस्मिना शेख, सुनीता पाटील, रणजित पाटील यांनी स्वागत केले. महामंडलेश्वर शिवानंद स्वामी, डाॅ. सुशांत पिसे, डाॅ. पल्लवी दळवी, आयुर्वेदाचार्य डाॅ. एकनाथ कुलकर्णी, प्रा. प्र. द. कुलकर्णी, डॉ. योगेश सदगीर, योगाचार्य अशोक पाटील, जीवराम गावले, डाॅ. शुभांगी रत्नपारखी, डॉ. हेमचंद्र भसे, डॉ. राणे, मंदार भागवत, नरेश मालवदे आदी उपस्थित होते.
—
–