नाशिक : प्रतिनिधी
सिडको येथील धम्मगिरी सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक संस्था संचलित सोपान योग महाविद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
याप्रसंगी सेवानिवृत्त प्राचार्य एन. के. देवरे, योगाचार्य व महाराष्ट्र योगशिक्षक संघाचे पहिले संमेलनाध्यक्ष अशोक पाटील, प्रा. राज सिन्नरकर, संस्थेचे संचालक राजेंद्र काळे, संस्था सचिव डॉ. पल्लवी जाधव, संस्थेचे मार्गदर्शक डॉ. विशाल जाधव, एल. डी. कोळंबे, प्रफुल्ल जोशी, प्रा. शेलार, आकाश चव्हाण, संस्थेचे अध्यक्ष कैलास जाधव, ॲड. शरद जाधव, हर्षल पाटील यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व स्वागत सोपान योग महाविद्यालयाचे प्राचार्य यु. के. अहिरे यांनी केले.
—
नाशिकमधील सोपान योग महाविद्यालयात ध्वजारोहण उत्साहात
Get real time updates directly on you device, subscribe now.