नाशिक : प्रतिनिधी
महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशनने येथील डाॅ. तस्मिना शेख यांना योग स्पर्धांसाठी पंच म्हणून काम करण्यास मान्यता दिली आहे. असोसिएशनचे सतीश मोहगावकर, डाॅ. संजय मालपाणी व भालचंद्र पडाळकर यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र डाॅ. शेख यांना नुकतेच प्रदान करण्यात आले. डाॅ. तस्मिना शेख यांनी असोसिएशनचा याबाबतचा प्रशिक्षण वर्ग नुकताच पूर्ण केला आहे. त्यामुळे त्या आता संघटनेतर्फे होणाऱ्या विविध योगस्पर्धांमध्ये पंच म्हणून काम करू शकतील. डाॅ. शेख या योगशास्त्र व निसर्गोपचार यात अभ्यासक म्हणून ओळखल्या जातात. तसेच त्या पुष्पावतीबाई चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षाही आहेत.
—
डाॅ. तस्मिना शेख यांची योग स्पर्धांच्या पंचपदी नियुक्ती
Get real time updates directly on you device, subscribe now.