नाशिक : प्रतिनिधी
साईराम क्लिनिक व लुपिन डायग्नोस्टिक्स (कैवल्य पॅथोलाॅजी लॅब) यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत रक्त तपासणी शिबिरात पहिल्या दिवशी 100 नागरिकांनी तपासणी केली. या शिबिरात डॉ. सचिन देवरे, डाॅ. प्रतिक्षा देवरे, रितेश आहेर, जयश्री जाधव यांनी रुग्णांना मार्गदर्शन करुन मोफत तपासणी केली.
या शिबिरास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. उर्वरित नागरिकांनी रविवारी (दि.23 जुलै) मोफत तपासणी करून घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळी आठ ते दुपारी एक वाजेपर्यंत हे शिबीर असेल. साईराम क्लिनिक, चांदवडकर नगर, राजगार्डन हॉटेलसमोर, राऊ हॉटेल चौफुली, पेठरोड येथे हे शिबीर भरेल.
—