म्हसरूळ, (वा.)
वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्दकीय मदत कक्षाच्या नाशिक शहराच्या उपमहानगर समन्वयकपदी डाॅ. पंकज वाल्हेकर यांची निवड करण्यात आली आहे.
उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख व जिल्हा समन्वयक योगेश म्हस्के व नाशिकचे माजी महानगरप्रमुख महेश बडवे यांच्यातर्फे डाॅ. वाल्हेकर यांनी पदभार स्वीकारला. एक वर्षाकरीता ही निवड करण्यात आली आहे.
शिवसेना पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व युवासेनाप्रमुख तथा पर्यावरण आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच नगरविकास व सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार ही निवड करण्यात आली आहे.
शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून गरजू आणि आर्थिक दुर्बल घटकांतील रुग्णांना धर्मादाय रुग्णालयांत राखीव खाटा उपलब्ध करुन देणे. निकषात बसत असलेल्या गरीब रुग्णांवर पूर्णतः मोफत किंवा सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करण्यासंदर्भातील मदत करणे. तसेच महात्मा फुले जनआरोग्य योजनेतंर्गत नोंदणी असलेल्या रुग्णालयांमध्ये गरजू रुग्णांना शस्त्रक्रिया मोफत करण्यासंदर्भात डाॅ. वाल्हेकर आता मार्गदर्शन करतील.
गंभीर, महागड्या शस्त्रक्रिया करावयाच्या असलेल्या गरीब, गरजू रुग्णांना भरीव प्रमाणात अर्थसहाय्य व्हावे, याकरीता पंतप्रधान वैद्दकीय सहाय्यता निधी, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, श्री सिध्दिविनायक ट्रस्ट, टाटा ट्रस्ट यासारख्या विविध ट्रस्टच्या माध्यमातून मदत मिळवून देण्यासाठी थेट शिवसेना भवन येथील मुख्य कार्यालयास संपर्क साधण्याचे काम या समन्वयकास करावे लागते.
—