नाशिक : प्रतिनिधी
पंचवटी मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर्स व महात्मा फुले ज्येष्ठ नागरिक संघाचे सभासद यांच्या संयुक्त विद्यमानाने येथील पोकार काॅलनी येथे 30 झाडे लावुन वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पाडला. या बागेच्या स्वच्छतेच्यादृष्टीने साफसफाईही करण्यात आली.
यांची उपस्थिती
सालाबादाप्रमाणे पंचवटी मेडिकल असोसिएशनचे सर्व डॉक्टर्स सामाजिक बांधिलकी जपत वृक्षारोपणाचा कार्यक्रम दिंडोरी रोड परिसरात विविध ठिकाणी आयोजित करत असतात. या प्रसंगी पंचवटी मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सचिन देवरे, सेक्रेटरी डॉ. वैभव जोशी, खजिनदार डॉ. योगेश पगार, उपाध्यक्ष डॉ. सुबोध कोठुळे, महिला प्रमुख डॉ. रोशनी बोरा, डॉ.पंकज वाल्हेकर, डॉ. शैलेश सुराणा, डॉ. सचिन भांबेरे, डॉ. पद्माकर खरात, डॉ. रवींद्र मुळक, डॉ. कुणाल लहरे, डॉ. रवीकिरण निकम, डॉ. सोहम चांडोले, डॉ. पंकज निकम, डॉ. निलेश कुंभारे, डॉ. अमोल शिंदे, डॉ. सुरेश बोरा, डॉ. निकिता चांडोले, डॉ. स्मिता वाणी, डॉ. चंचल जोशी आधी डॉक्टर्स उपस्थित होते.
ज्येष्ठ्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा
त्याचप्रमाणे महात्मा फुले ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने अध्यक्ष लक्ष्मीकांत व्यवहारे, सचिव अनिल देवरे, एकनाथ जगताप, अशोक जगताप, दिलीप निकुंभ, चंद्रात्रे, भुतडा, शिंपी आदी परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी या उपक्रमात सहभाग नोंदविला. सामाजिक कार्यकर्ते सुनील निरगुडे, सचिन पवार, राहुल सानप, लखन राख, योगेश मोहिते, शिक्षक संघटनेचे पदाधिकारी मधुकर आहेर, प्रकाश गोसावी आदी उपस्थित होते.
वृक्षारोपणाचा कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्वांचे आभार मानतो व लावलेल्या झाडांचे पुढे देखील संगोपन करण्यात येईल. तसेच विविध ठिकाणी दर रविवारी असेच वृक्षारोपणाचे कार्यक्रम राबवू.
– डॉ. सचिन देवरे, पंचवटी मेडिकल असोसिएशन